गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी - ना. आशुतोष काळे

आमदार आशुतोष काळे
आमदार आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाढ होण्याचे संकेत देण्यात आल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी व कोणत्याही प्रकारची संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.

हवामान खात्याकडून अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेली पावसाची संततधार तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढलेला जोर त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जवळपास 55 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

रात्रीतून हा विसर्ग 60 हजार क्युसेकच्यावर जाऊन त्यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता असून विसर्ग वाढल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन ना.काळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com