गोदावरी नदीवरील नियोजित पुलाचे काम सुरु करावे - वहाडणे

गोदावरी नदीवरील नियोजित पुलाचे काम सुरु करावे - वहाडणे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा (Puntamaba) परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी पुणतांबेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या गोदावरी नदीवरील (Godavari River) नियोजित पुलाचे काम सुरु करावे, अशी मागणी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष संदीप वहाडणे (Sandeep Vahadane) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Public Works Minister Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

2008 मध्ये या पुलाला माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ (Former Public Minister Chhagan Bhujbal) यांनी तांत्रिक मान्यता देऊन 8 कोटी रुपयाचा निधीही मंजूर (Fund) केला होता. मात्र पुलाच्या जागी लाख गंगा (Lakh Ganga) की पुरणगाव (Purangav) या गावाच्या ठिकाणी असावी या वादावरून पुलाचे काम मागे पडले. आता तर पुलाचा खर्च वाढला म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पुलामुळे औरंगाबाद (Aurangabad) व अहमदनगर (Ahmednagar) हे दोन्ही जिल्हे एकमेकांना जोडले जाणार असून दक्षिणेकडील साईभक्तांना शिर्डीला येण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.

पुणतांबा परिसर व गोदावरी नदीकाठच्या (Godavari River) गावांना विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या वैजापूर-पुणतांबा (Vaijapur-Puntamba) या मार्गावर गोदावरी नदीवर (Godavari River) पुलाचे काम सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. पुलाचे काम झाल्यास नदीकाठच्या चार-पाच गावातील विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी पुणतांबा (Puntamba) येथे येणे सोयीस्कर होणार आहे. सर्वच दृष्टीकोनातून या पुलाचे असाधारण महत्व असून या प्रश्नाला चालना देण्यासाठी परिसरातील शिष्टमंडळ ना. एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचेही श्री. वहाडणे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com