गोदावरी उजव्या कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन सुरू, डाव्याला रविवारी पाणी

गोदावरी उजव्या कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन सुरू, डाव्याला रविवारी पाणी
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरी उजव्या कालव्याचे रब्बीचे पहिले सिंचन आवर्तन सुरू झाले आहे. या आवर्तनासाठी दारणातून 500 क्युसेकने पाणी काढण्यात आले आहे. कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार आहे.

2 डिसेंबरला धरणांच्या पाणलोटात तसेच लाभक्षेत्रात हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. धरणांचे रिकामे झालेले साठे यामुळे पुर्वस्थितीत आले होते. तर लाभक्षेत्रातील उभ्या पिकांची एक प्रकारे भरणीच झाली होती. अशातच बिगरसिंचनासाठी जलसंपदा विभागाने उजव्या कालव्याला 3 डिसेंबरपासून पाणी सोडले होते. या पाण्यात सर्वच पिण्याच्या पाण्याचे तलाव भरुन जलसंपदाने 4-5 दिवसांपासून सिंचन सुरु केले आहे. गोदावरी उजव्या कालव्यावर 1410 हेक्टर क्षेत्राला मागणी होती.

परंतु काही शेतकर्‍यांनी पाणी या आवर्तनातील पाणी घेतले नाही. त्यामुळे हे आवर्तन लवकर पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. चितळी, वाकडी भागातील सिंचन करुन अस्तगाव, राहाताचे सिंचन सुरु आहे.12, 13, 14, 15 या वितरीकांना सिंचनाचे आवर्तन सुरु आहे. लवकरच पाणी वर वर जाईल. त्यामुळे या आवर्तनातील पाणी काही प्रमाणात शिल्लक राहुन उन्हाळी हंगामासाठी याची मदत होवु शकते. या आवर्तनासाठी दारणातून पाणी काढण्यात आले आहे. पावसाने बिगरसिंचनाचे आवर्तन पूर्ण झाले! सिंचनासाठी दारणातून पाणी काढले आहे.

दरम्यान गोदावर चा डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या रविवार पासून सुरू होऊ शकते. 14 किमी अंतरावरील निफाड च्या रुई भागात एका कल्व्हर्टची भिंत तुटल्याने हे आवर्तन सुरु नव्हते. त्या भिंतीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या रविवारी सायंकाळी कोपरगाव च्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याला आवर्तन सोडले जाणार आहे, अशी माहिती जलसंपदाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com