Video : गोदावरीला पूर आल्यामुळे काथनाल्यावर पाणी

पुणतांबा - कोपरगाव मार्गावरील वाहतूक बंद
Video : गोदावरीला पूर आल्यामुळे काथनाल्यावर पाणी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

नाशिक जिल्हयात (Nashik District) दारणा (Darana), तसेच गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीला पूर (Godavari River Flood) आला आहे. गोदावरी नदीत (Godavari River) अंदाजे ऐंशी हजार क्युसेसु पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाने सुद्धा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

पुणतांबा (Puntamba) येथे ही काल सकाळपासूनच नदीच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होती पाणी वाढल्यामुळे येथील काथ नाला पुलावर ४ फुटापेक्षा जास्त पाणी आल्यामुळे काथ नाल्यावरून पुणतांबा (Puntamba) तसेच कोपरगावकडे (Kopargav) जाणारी वाहतूक बंद झाली आहे. तसेच काथ नाल्या लगत सखल भागात असणाऱ्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे तसेच गोदावरी नदीकाठालगत असणार्‍या अनेक विहीरी (Well) पुराच्या (Flood) पाण्याखाली गेल्या आहेत. नदीला पाणी वाढणार आहे म्हणून अनेक शेतकर्‍यांनी आगोवरच विहीरीवरील विद्युत पंप काढून ठेवले होते.

गोदावरी नदीला पूर (Godavari River Flood) आल्यामुळे येथील कोल्हापूर पध्दतीच्या वसंत बंधार्‍याच्या पुलावरून पाणी वाहत होते त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या डोणगाव लाख बापतरा सह अनेक गावांचा पुणतांब्याशी दररोज चा संपर्क बंद झाला आहे. बंधार्‍याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुणतांबा येथे शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना काल शाळेत येता आले नाही.

पुरामुळे येथील योगीराज चांगदेव महाराज मंदिरा जवळ असलेल्या विठठल घाटाचे तीन टप्पे पाण्याखाली गेले आहेत. तसेच नदी काठची अनेक छोटी मोठी मंदिरे सुद्धा पुराच्या पाण्यामुळे वेढली आहे. काल सकाळपासूनच नदीच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असल्यामुळे गोदावरीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मागील वर्षी सुद्धा जुलै महिन्यातच गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती. चालू वर्षीही जुलै महिन्यातच पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्या स मदत झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com