
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अधून-मधून सुरु असलेल्या रिपरिपीमुळे धरणातील विसर्ग सुरुच आहे. काल सकाळी गंगापूरचा विसर्ग बंद होता. तो पुन्हा रात्री 10 वाजता 1311 क्युसेक ने सुरु करण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 10345 क्युसेक ने विसर्ग सुरु होता.
पावसाची सलगता नसली तरी अधून मधून येणार्या पावसाने धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. धरणं काठोकाठ भरल्याने नवीन येणार्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल रात्री 10 वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार दारणातून 3512 क्युसेकने विसर्ग सुरु होता. गंगापूर मधून 1136 क्युसेक ने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कडवातून 848 क्युसेक, आळंदीतून 87 क्युसेक, पालखेड मधून 1311 क्युसेक असा विसर्ग धरणांमधून सुरु आहे. हे सर्व पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्यात दाखल होत असल्याने या बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 10345 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. त्यामुळे गोदापात्र भरुन वाहत आहे. काल सकाळी 10 वाजेपर्यंत गोदावरीत 16655 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो 11 वाजता 3155 क्युसेकने कमी करुन 13500 वर आणण्यात आला होता. नंतर तो 10345 क्युसेकवर आणण्यात आला.
काल शनिवारी सकाळी 6 वाजता मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 37 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणे 32 मिमी, भाम 32 मिमी, भावली 78 मिमी, वालदेवी 15 मिमी, गंगापूर 69 मिमी, कश्यपी 19 मिमी, गौतमी गोदावरी 69 मिमी, कडवा 52 मिमी, आळंदी 17 मिमी, मधमेश्वर 45 मिमी, नाशिक 33 मिमी, इगतपुरी 136 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीला 65 मिमी, त्र्यंबक ला 35 मिमी, असा पाऊस नोंदला गेला.
पावसामुळे दारणात 24 तासात 448 दलघफू पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणात 202 दलघफू पाण्याची आवक झाली. गोदावरी नदीत काल सकाळी 6 पर्यंत 1 जून पासून 10.5 टिएमसी पाण्याचा एकूण विसर्ग झाला आहे. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहुन गेले आहे.
गोदावरीच्या कालव्यावरील पाऊस असा- देवगाव 9 मिमी, ब्राम्हणगाव 19 मिमी, कोपरगाव 43 मिमी, पढेगाव 5 मिमी, सोमठाणा 29 मिमी, कोळगाव 21 मिमी, सोनेवाडी 19 मिमी, शिर्डी 14 मिमी, राहाता 22 मिमी, रांजणगाव 15 मिमी, चितळी 9 मिमी असा पाऊस नोंदला गेला.