गोदावरीच्या दोन्ही कालव्यांतूनदुसरे उन्हाळी आवर्तन सुरू

गोदावरीच्या दोन्ही कालव्यांतूनदुसरे उन्हाळी आवर्तन सुरू

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरी कालव्यांचे उन्हाळी आवर्तन आजपासून सुरू होत आहे. यासाठी गोदावरी कालवे वाहते झाले आहेत. उन्हाळी पहिल्या आवर्तनालाच जोडून हे आवर्तन घेण्यात आले आहे. हे या हंगामातील सिंचनाचे शेवटचे आवर्तन असेल.

पहिले उन्हाळी आवर्तन 30 एप्रिल रोजी संपले. आता दुसर्‍या आवर्तनासाठी कालव्याच्या मुखाजवळ गेलेले पाणी 1 मे रोजी खाली काढण्यात आले आहे. उजव्याचे पाणी काल पुणतांबा या टेल भागातील पाणी योजनांसाठी देण्यात आले. आज गुरुवारी टेल टू हेड सिंचन सुरू करण्यात येणार आहे. दारणा धरणातून या सिंचनासाठी 600 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरीच्या उजव्या कालव्यावर यावर्षी उन्हाळी आवर्तनासाठी 880 हेक्टर क्षेत्राला पाण्याची मागणी आहे. गेल्यावर्षी 1400 हेक्टरला उजव्याला मागणी होती. ती यावर्षी 520 हेक्टरने घटली आहे.

कोपरगावच्या दिशेने वाहणार्‍या डाव्या कालव्यावर सिंचनासाठी मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या कालव्यावर 1160 हेक्टरची मागणी उन्हाळी आवर्तनासाठी आहे. या कालव्यावर 18 पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. हेक्टर क्षेत्राला मागील वर्षीच्या तुलनेत मागणी घटली आहे. मागील वर्षी 1209 हेक्टरला मागणी होती.

या दोन्ही कालव्यांचे सिंचनाचे आवर्तन साधरणत: मे अखेर पयर्ंंत चालणार आहे. दरम्यान काल सकाळी 6 च्या आकडेवारीनुसार दारणात 48.76 टक्के, गंगापूर धरणात 46.55 टक्के, मुकणे 43.29 टक्के, वाकी 5.62 टक्के, भाम 18.63 टक्के, भावली 26.50 टक्के, वालदेवी 37.38 टक्के, कश्यपी 27.81 टक्के, गौतमी गोदावरी 43.25 टक्के, कडवा 23.70 टक्के, आळंदी 32.35 टक्के असा पाणी साठा आहे. सध्या दारणातून 600 क्युसेक, वाकीतून 330 क्युसेक, भाम मधून 300 क्युसेक, भावलीतून 180 क्युसेक इतके पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com