
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
मढी (Madhi) येथील रहिवासी भानुदास मुरलीधर डहाळे यांचा रविवारी सायंकाळी शहाजापुर पुलानजिक गोदावरी उजव्या कालव्यामध्ये (Godavari Canal) मृतदेह (Dead Body) तरगंताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
रविवारी सांयकाळी कोळगाव माळ (Kolgav) येथील बाजारकरू कालव्याच्या रस्त्याने कोळपेवाडी येथे बाजारसाठी जात असतांना शहाजापुर पूला नजिक त्यांना पुरुष जातीचा मृतदेह (Dead Body) तंरगताना आढळून आला. त्यांनी ही माहिती शहाजापुरचे पोलीस पाटील इंद्रंभान ढोमसे यांना दिली. त्यांनी घटनेची माहिती तालुका पोलीस स्टेशनला (Kopargav Taluka Police Station) दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार ढाकराव, पोलीस नाईक राजु चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत मृतदेह नागरिकांच्या मदतीने कालव्यामधुन बाहेर काढला.
त्याच्या खिशामधील डायरीच्या मदतीने हा मृतदेह (Dead Body) मढी बु. येथील रहिवासी भानुदास मुरलीधर डहाळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पीएसआय तुषार ढाकराव यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत डहाळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मयताचे पुतणे चंद्रकांत डहाळे यांच्या खबरीवरुन कोपरगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
सदर व्यक्ती रविवारी सकाळपासुन घरातुन बाहेर पडुन कोळपेवाडी येथील नातेवाईकाकडून औषध गोळ्यासाठी पैसे घेवून गेली होती. दुपारी शहाजापुर 6 चारी कंडेक्सर पिठ या ठिकाणी नागरिकांना डहाळे बसल्याचे आढळून आले होते. बुडाले ल्या ठिकाणी चपला व टोपी तर काही अंतरावर पुलाच्या पुढे सायंकाळी डहाळे यांचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. कालव्याला उन्हाळ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन 550 क्युसेकने चालू आहे. मागील आवर्तनामध्ये पोहण्यासाठी गेलेला सुनिल माळी हा युवक पाण्यात बुडवून त्याचा मृतदेहही याच ठिकाणी आढळून आला होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहता न येणार्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन पोलीस पाटील ढोमसे यांनी केले आहे.