गोदावरी कालव्यातुन सलग दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु
File Photo

गोदावरी कालव्यातुन सलग दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गोदावरी कालव्यातून उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन सुरु झाले आहे. सलग घेत असलेल्या दोन्ही आवर्तनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे आवर्तन आहे.

उन्हाळी पहिले आवर्तन 15 एप्रिलला सोडण्यात आले होते. हे आवर्तन 15 मे पर्यंत चालले. त्यानंतर 16 मे पासून उन्हाळी दुसरे आवर्तन सलग सुरु केले आहे. मागील आवर्तन टेल टू हेड असे सुरु होते. पहिले आवर्तन संपल्यानंतर 16 रोजी पाणी पुन्हा टेलच्या दिशेने काढण्यात आले आहे. हे पाणी काल राहात्यात होते. ते पुन्हा चितळीच्या दिशेने जात आहे.

गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना सलग दुसर्‍या आवर्तनासाठी पाणी टेलच्या दिशेने सोडण्यात आले आहे. पहिले आवर्तन महिनाभर चालले. दोन्ही कालवे मिळून 3.5 टिएमसी पाण्याचा वापर झाला. आता हे सलग दुसरे आवर्तन असल्याने पाण्याचा वापर 2.5 टिएमसी इतका होवु शकतो. असा जलसंपदा विभागाचा अंदाज आहे. कालवा ओलसर असल्याने वहन व्यय कमी होईल. शिर्डीला पाणी दिल्यानंतर आता दुसर्‍या आवर्तनाचे पाणी खाली काढण्यात आले.

या आवर्तनातील पाणी पुन्हा बिगर सिंचनासाठी तसेच सिंचनासाठी देण्यात येणार आहे. दुसरे आवर्तन हे 10 जूनपर्यंत चालेल. दारणा धरणातून पाणी या आवर्तनासाठी सोडण्यात येत आहे. गोदावरीचा उजवा व डावा कालवा वाहत आहे. जलद कालवा बंद झाला आहे.

पहिले उन्हाळी आवर्तन 15 दिवस उशिराने सुरु झाले असले तरी भर उन्हाळ्यात पिकांना सलग दुसरे पाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाने चांगले नियोजन केले आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे सलग उन्हाळी दोन आवर्तनाची मागणी केली होती.

- मुकूंदराव सदाफळ, अध्यक्ष, गणेश कारखाना.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com