चोरलेल्या शेळ्या लोणीच्या बाजारात विकणार्‍या महिलेसह दोघांना अटक

चोरलेल्या शेळ्या लोणीच्या बाजारात विकणार्‍या महिलेसह दोघांना अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या मुलाच्या गोट फार्मवरून चोरलेल्या शेळ्या लोणी येथील जनावरांच्या बाजारात विकणार्‍या दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली.

दामिनी बबन राशिनकर (वय 20, रा. श्रीरामपूर), मनोज उत्तम जाधव (वय 26, रा. वाकडी ता. राहाता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. माजी आ. कांबळे यांचे चिरंजीव संदीप भाऊसाहेब कांबळे (वय 34, रा. गोंधवणी, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली होती.

गोंधवणी शिवारात श्री. कांबळे यांचे शेळी (गोट) फार्म आहे. गोट फार्मवरून सहा शेळ्यांची चोरी झाली होती. या शेळ्या लोणीच्या बाजारात विकल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यावरून पोलिसांनी लोणीच्या बाजारात जाऊन तपास केला असता, तेथे असलेल्या शेळ्या कांबळे यांनी ओळखल्या. पोलिसांनी दामिनी राशिनकर व मनोज जाधव यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली.

चोरलेल्या तीन शेळ्यांची त्यांनी विल्हेवाट लावली होती. त्यांनी 26 हजार रुपयांच्या तीन शेळ्या पोलिसांच्या स्वाधीन केल्या. पोलिसांनी जाधव व राशिनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस नाईक साईनाथ राशिनकर, रघुवीर कारखेले, गौतम लगड, राहुल नरवडे, गणेश गावडे, रमिझराजा अत्तार, बाळासाहेब गुंजाळ, मीरा सरग, योगिता निकम यांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com