बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील माहेगाव देशमुख (Mahegav Deshmukh) येथील सखाराम लांडगे यांच्या दोन शेळ्या बिबट्याने हल्ला (Goat Attack Leopard) करून मारुन टाकल्या. या घटनेने माहेगाव देशमुख परिसरात बिबट्याच्या दहशतीने घबराहाट पसरली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू
श्रीरामपुरात दोन गटामध्ये राडा कट्ट्यातून गोळीबार: एक अत्यावस्थ

माहेगाव देशमुख (Mahegav Deshmukh) ग्रामपंचायत समोर लांडगे वस्ती येथेे सोमवारी रात्री गोठ्या बाहेर बांधलेल्या विस हजार रुपये किंमतीच्या दोन शेळ्या (Goat) बिबट्याने ठार केल्या. कुत्रे भुंकण्याचा आवाज ऐकून लोक जागे झाले. तेंव्हा बिबट्या (Leopard) त्यांना बघुन मकाच्या शेतात पसार झाला. दावे बांधलेल्या ऐका शेळीचे नरडे फोडले तर एकीचे पोट. हल्ला झालेल्या ठिकाणी शेतामधील माती मध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू
975 पोलिसांच्या होणार बदल्या

दोन दिवसापूर्वी माहेगाव देशमुख, कुभांरी शिवेवर असणार्‍या वन जमिनी लगत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या भिमा माळी यांच्या कळपातील एक शेळी बिबट्याने (Leopard) अलगत उचलून नेत राखीव वनात नेवून फडशा पाडला. तालुक्यात गोदावरी नदीच्याच्या तिरावर बारमाही ऊसाची व मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याचेे दर्शन नागरिकांना होत असते. शेतकर्‍यांच्या पशुधनावर बिबट्याचे (Leopard) सातत्याने हल्ले होत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू
खारघर घटनेत शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा

मंजूर शिवारात उपासमारी मुळे बिबट्या मृत पावल्याची घटना नुकतीच घडलेली आहे. वन विभागाने (Forest Department) या परिसरात पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकर्‍यांना नुकसान (Farmers Loss) भरपाईचा योग्य मोबदला द्यावा अशी मागणी उल्हास काळे यांनी वन विभागाकडे केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू
कर्डिलेंची दहशत; मतदार बळजबरीने सहलीवर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com