गोवा ते शिर्डी विमानसेवा सुरु करा

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावकेंची मागणी
गोवा ते शिर्डी विमानसेवा सुरु करा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोवा ते शिर्डी विमान सेवा सुरु करावी, अशी मागणी भाजयुमाचे राहाता तालुकाध्यक्ष सतीश बावके यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साई दर्शनासाठी शिर्डी विमानतळावर उतरल्यावर भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, उपाध्यक्ष नवनाथ मुजमूले, मिलिंद बनकर, गणेश आरणे, राहुल बावके, जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा, युवा मोर्चाचे सरचिणीस अतुल बोठे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री सावंत यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छाही या कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी बावके यांनी त्यांना गोवा-शिर्डी विमान सेवा सुरु करण्याचा आग्रह धरला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारत्मकता दर्शवत या मागणीला हिरवा कंदिल दाखविला.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिर्थक्षेत्र आहे. त्यामुळे राज्य तसेच परराज्यातून या विमानतळावर विमान सेवा सुरु झाली आहे. गोवा देखील अंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. गोवा ते शिर्डी विमानसेवा सुरु झाल्यास गोव्यातील साईभक्त मोठ्या प्रमाणात शिर्डी येथे साईंच्या दर्शनाचा कमी वेळात लाभ घेऊ शकतात. तसेच शिर्डीत आलेले साईभक्त देखील गोव्यातील पर्यटनाचा लाभ घेऊ शकतात. तरी गोवा ते शिर्डी विमानसेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.