गोव्याच्या दारुचा टेम्पो बाभळेश्वर येथे पकडला

गोव्याच्या दारुचा टेम्पो बाभळेश्वर येथे पकडला

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

गोव्यावरुन रॉयल चॉईस कंपनीच्या दारुच्या बॉक्सने भरलेला आयशर टेम्पो काल श्रीरामपूर येथील दारु उत्पादन शुल्क विभागाने पकडला. रात्री उशिरापर्यत याप्रकरणी कारवाई सुरु होती.

काल दुपारच्या सुमारास दारु उत्पादन शुल्कच्या विभागाने बाभळेश्वर चौकात थांबून एक संशयित आयशर टेम्पो चालला असता तो थांबविला. या टेेम्पोमध्ये रॉयल चॉईस कंपनीच्या दारुच्या बाटल्यांचे बॉक्स होते. याप्रकरणी या विभागाने त्यांचे विभाग प्रमुख पोलीस अधिक्षक यांना माहिती कळविली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ते बाभळेश्वर येथे कारवाईसाठी पोहोचू शकले नव्हते.

याबाबत माहिती घेतली असता हा आयशर टेम्पो दारुचे बॉक्स गोवा येथून गुजरातकडे चालला होता. महाराष्ट्र राज्यातून जात असताना तो टॅक्स न भरता चालला असल्यामुळे कारवाई केली असल्याची माहिती त्या विभागाकडून कळाली. मात्र ही दारु बनावट होती काय? असा संशयही व्यक्त केला जात होता. रात्री उशिराने या विभागाचे प्रमुख आल्यानंतर या बॉक्सची मोजदाद सुरु होणार होती. त्यामुळे या टेम्पोत किती बॉक्स व किती किंमतीचा माल होता याबाबतची माहिती मिळणार होती. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com