जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीआता ई-पासची सक्ती

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीआता ई-पासची सक्ती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अत्यावश्यक कामानिमीत्त घराबाहेर पडणार्‍यांना आता ई-पास लागणार आहे. जिल्हाबाहेर जाण्यासाठी या ई-पासचा उपयोग होणार आहे. पोलीस प्रशासनाने ई-पास सुविधा उपलब्ध केली आहे. संचारबंदीतही विनाकारण बाहेर फिरणार्‍यांची संख्या जास्त आहे. करोनाचा वाढता संसर्गाची साथसाखळी तोडण्यासाठी प्रशासनाने हे पाऊस उचलले आहे.

ज्या नागरिकांना अत्यंत महत्वाच्या (वैद्यकीय कारण/अत्यावश्यक सेवा/अंत्यविधी) कामानिमित्त घरातून बाहेर व इतर जिल्हाबाहेर जाण्यासाठी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जावून आपला फोटो अपलोड करुन अर्ज करावा. तसेच अर्ज करताना घराबाहेर जाण्याच्या कारणासह संबंधित कागदपत्रे जोडावे लागणार असल्याचे अहमदनगर जिल्हा पोलिस दलातर्फे बजावले आहे.

ई-पास मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळालेला सांकेतिक क्रमांक जतन करून ठेवावा. तसेच सदर संकेतस्थळावर पुन्हा जावून आपला सांकेतिक क्रमांक टाकून ई-पास प्राप्त करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com