आता नैसर्गिक ऑक्सिजन रूग्णांना देण्याची तयारी

आता नैसर्गिक ऑक्सिजन रूग्णांना देण्याची तयारी

जिल्हा रूग्णालयात यंत्रणा कार्यान्वित

अहमदनगर|Ahmedagar

जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी दररोज चार टँक्टर ऑक्सिजनची गरज असताना सध्या फक्त दोन ते तीन टँक्टर येत आहे.

ऑक्सिजन पूर्ण क्षमतेने मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याच बरोबर हवेतील ऑक्सिजन रूग्णांना देण्यासाठीची यंत्रणा जिल्हा रूग्णालयात बसविण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात हा प्रयोग सुरू होणार असल्याची माहिती कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली.

आ. पवार नगर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आज रूग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरूळीत करण्यासाठी पालकमंत्री, प्रशासन लक्ष ठेवून आहे. जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, खाजगी रूग्णालयांना आज सुमारे 50 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. याचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रशासन, शासन लक्ष ठेवून आहे. जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण क्षमतेने व्हावा यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची बैठक झाली. याचबरोबर जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात सातत्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आता सध्या ऑक्सिजनची जी कमरता भासत असून तो पुरवठा कसा सुरळीत होईल यावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मस्ती करणार्‍यांवर कडक कारवाई करा

निर्बंध लावले असताना विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यावर प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. जीव वाचावणे आज महत्वाचे झाले आहे. अशाही परिस्थित लोक बेजबाबदारपणे बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. परंतू, जे गरीब लोक पोट भरण्यासाठी बाहेर पडतात त्यांच्या कारवाई बाबत प्रशासनाने संवेदनशील राहणे आवश्यक असल्याचे मत आ. पवार यांनी व्यक्त केेले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com