मोफतच्या अन्न धान्यांवर भागत नसून आर्थिक मदत द्या - विडी कामगार

मोफतच्या अन्न धान्यांवर भागत नसून आर्थिक मदत द्या - विडी कामगार

अहमदनगर (प्रतिनिधी) - टाळेबंदीत उदरनिर्वाहासाठी विडी कामगारांना दोन हजार रुपक्या अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी लालबावटा विडी कामगार युनियनच्या (आयटक) वतीने श्रमिकनगर क्याथे विडी कामगारांनी घरा बाहेर क्याऊन निदर्शने केली.

रेशनवर मिळणारे गहू, तांदूळ व डाळवर कुटुंब चालत नसून, इतर गरजा भागविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अनुदान देण्याची मागणी विडी कामगारांनी यावेळी केली. अन्यथा श्रमिक बालाजी मंदिराच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला. तसेच विडी कामगारांच्या मदतीसाठी धावून आलेल्या साबळे वाघीरे या कंपनीने सर्व कामगारांना एक हजार रुपक्या आगाऊ रक्कम दिल्याने संघटना व विडी कामगारांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. टाळेबंदी काळात एमआयडीसी सुरू असून, तेथील कामगारांना पगार मिळत आहे. सरकारी कर्मचार्‍यांनाही पगार सुरू आहे. रिक्षाचालक, बांधकाम कामगार, मोलमजूर यांना राज्य सरकारने दीड हजार रुपक्या अनुदान देण्याचे जाहीर केले.

विडी कामगारांना एक महिना झाला असून त्यांचे हातावर असलेले विडी वळण्याचे काम बंद आहे. विडी कामगार आर्थिक दुर्बल घटक असून रोज मजूरी करुन त्यांचा प्रपंच चालत असतो. शहरात चार ते पाच हजार विडी कामगार असून, टाळेबंदीत सर्व काही बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने सातत्याने संघटनेच्या वतीने दोन हजार रुपक्या अनुदान मिळण्याची मागणी लाऊन धरण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, शोभा पासकंठी, शारदा आडेप, रेणुका अंकारम, संगिता कोंडा, भाग्यलक्ष्मी, गड्डम, निर्मला न्यालपेल्ली, सुनिला बिटला, रेणुका दिकोंडा, वन्ना कल्याणम आदिंसह परिसरातील विडी कामगार महिला उपस्थित होत्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com