प्रवरा नदीच्या पुलावरून युवतीने मारली उडी

पोलिस व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने युवती बचावली
प्रवरा नदीच्या पुलावरून युवतीने मारली उडी

नेवासा | तालुका वार्ताहर

नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील प्रवरा नदीवरील पुलावरून नेवासा फाटा येथील युवतीने (वय२२) उडी मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मात्र पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने ती युवती बचावली.

दरम्यान, या घटनेची माहीती समजताच पो.हे.कॉ.तुळशीराम गिते यांनी स्थानिक युवकांना सोबत घेऊन नदी पात्राकडे धाव घेतली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी नदी पात्रालगत राहणाऱ्या सचिन गरुटे या युवकास नदी पात्रात चप्पू घेऊन जाण्यास सांगितले. सचिन याने सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न करून सदर युवतीस वाचविले. त्यानंतर या युवतीस घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर घटनेमागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

सदर घटनेची गांभीर्यता ओळखून तत्परता दाखवून युवतीस वाचविल्याबद्दल पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते सचिन गरुटे व पो.हे.कॉ.तुळशीराम गीते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, नगरसेवक दिनेश व्यवहारे, जितेंद्र कुरहे, नितीन कराळे, वृक्षमित्र भैय्या कावरे, स्वप्नील मापारी, अमित मापारी, पत्रकार अभिषेक गाडेकर, मकरंद देशपांडे, अजित नरूला, सागर देशमुख उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com