सायकल खेळताना हॅन्डलचा नट घशात अडकल्याने मुलीचा मृत्यू

सायकल खेळताना हॅन्डलचा नट घशात अडकल्याने मुलीचा मृत्यू

गुहा |वार्ताहर| Guha

सायकल खेळताना खाली पडून हॅन्डलचा नट घशात अडकल्याने तिसरी इयत्तेत शिकणार्‍या 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुरी तालुक्यातील त्रंबकपूर येथे ही घटना घडली. राधा बाबासाहेब कोळसे असे या मुलीचे नाव आहे.

राधा ही गुहा येथील तनपुरे कारखान्याचे माजी संचालक कै. बाबुराव रंगनाथ पा. कोळसे यांची पणती आहे. रविवारची सुट्टी असल्याने राधा सायकल खेळण्यासाठी रोडवर गेली होती. परत घराकडे फिरण्यासाठी सायकल वळवित असताना तोल जाऊन ती खाली पडली. यावेळी सायकलच्या हॅन्डलचा नट तिच्या घशात अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गुहा, त्रंबकपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com