घुलेवाडी परिसरात किरकोळ कारणावरून पोलिसाला मारहाण

घुलेवाडी परिसरात किरकोळ कारणावरून पोलिसाला मारहाण

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

किरकोळ कारणावरून चक्क पोलिसाला मारहाण करून घरात कोंडून ठेवल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील घुलेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी 12 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल कारभारी खताळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अलका अनिल खताळ, कुसूम निवृत्ती राहणे, निवृत्ती किसन राहणे, कैलास निवृत्ती राहणे, शरद निवृत्ती राहणे, संतोष निवृत्ती राहणे, लता कैलास राहाणे, निता शरद राहणे, संतोष राहणे याची पत्नी सर्व राहणार चंदनपुरी, राधाकिसन अण्णासाहेब हासे, सुरेखा राधाकिसन हासे राहणार राजापूर यांनी गैर कायद्याची मंडळी जमावून हातात काठ्या व गज घेऊन येऊन आपणास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

घरात कोंडून घराला बाहेरून कुलूप लावून घेवून आपणास व आपल्या मुलाला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील बारा जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 148, 452, 341, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक फौजदार फटांगरे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com