
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
मोटार सायकलच्या डिक्की मध्ये ठेवलेली 2 लाख 13 हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरालगत घुलेवाडी परिसरात युनियन बँकेसमोर घडली. संगमनेर शहर व परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढलेले आहे. काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास शरद रमण गुजराथी यांनी आपल्या मोपेड वाहनाच्या डिक्की मध्ये रोख रक्कम ठेवलेली होती.
डिक्कीचे कुलूप लावून ते इतर ठिकाणी थांबलेले असताना चोरट्याने याचा फायदा घेतला. डिक्कीचे कुलूप तोडून या चोरट्याने रक्कम लांबवून पलायन केले. याबाबत गुजराती यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 183/2023 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.