घोष्ट किचन्सने बाळसे धरले !

अनेकांना मिळाला रोजगार । ग्राहकांनाही घरबसल्या ‘घरगुती’ पदार्थांची गोडी
घोष्ट किचन्सने बाळसे धरले !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाश्चिमात्य देशांत घोष्ट किचन्स (Ghost Kitchens) हा एक मोठ्या उलाढालीचा व्यवसाय (Business) आहे. आपल्याकडे घरगुती डबे (Household bins) पोहचविणार्‍या व्यवसायाचे हे सुधारित रूप. त्यास क्लाऊड किचन (Cloud Kitchen), होम किचन (Home Kitchen) असेही म्हटले जाते. करोना काळात एकीकडे हॉटेल व्यवसायाला फटका बसलेला असताना या घरगुती हॉटेलचा व्यवसायाने मात्र नगरमध्येही (Ahmednagar) बाळसे धरले आहे.

सध्या शहरात झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) अशा दोन कंपन्या फूड सप्लाय चेन चालवितात. शहरातील अनेक मोठी हॉटेल्स (Hotel) या कंपन्यांसोबत काम करतात. ऐन करोना लॉकडाऊनमध्येही (Lockdown) या कंपन्यांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे घरपोच हॉटेलिंगचा या व्यवसायाने हॉटेल व्यवसायाला (Hotel Business) काही प्रमाणात आधार दिला. मात्र हॉटेलचे (Hotel) महागडे पदार्थ आजही काही ‘शौकीनां’च्याच आवाक्यात आहेत.

त्यामुळे सामान्य गरजवंत ऑनलाईन खाद्यपदार्थ (Online Food)मागविताना स्वस्तातील मस्त पर्यायांकडे वळतो. हीच गरज लक्षात घेवून काहींनी सरकारी परवाने घेऊन वर्ष-दीड वर्षाच्या काळात घरगुती स्वयंपाकघर सुरू केले. सध्या देशातील मोठ्या शहरात घोष्ट किचन्सची (Ghost Kitchens) कॉर्पोरेट हाताळणी सुरू झाली आहे.

केवळ स्वयंपाकघर आणि स्वयंपाकी यांच्या मदतीने हा व्यवसाय उभारला जातो. हॉटेलसाठी लागते तशी बसण्याची जागा व अन्य गोष्टींचा खर्च यात टळतो. त्यामुळे किंमतीवरही नियंत्रण राहते. भारतात (India) आता घोष्ट किंवा क्लाऊड किचन्सच्या उद्योगासाठी प्रशिक्षणही (Training for the Cloud Kitchens industry) सुरू झाले आहे.

नगर शहरात (Nagar City) अनेक महिला लोणची, पापड, पोळ्या अशा व्यवसायात आधीपासून होत्या. मात्र आता ऑनलाईन खाद्यपदार्य विक्रीच्या व्यवसायातही अनेकांनी पाऊल टाकले आहे. साधरणपणे ऑनलाईन फुडसर्विसच्या (Online food service) माध्यमातून ‘किचन्स’ नावाने चालणारे व्यवसाय महिला आपल्या घरातून हाताळत आहेत.

फूडसेफ्टी, आवश्यक परवाने, माफक दर (Reasonable rates) आणि क्वालिटी फूड (Quality Food) यामुळे या व्यवसायाला प्रतिसादही मिळू लागला आहे. यातून अनेक महिलांना घरगुती रोजगाराचे साधनही उपलब्ध होत आहे. विद्यार्थी (Student) आणि एकट्याने राहणारे नोकरदार यांना जेवणाचा डबा (Lunch Tiffin) आधी पोहच होत असे. पण आता त्यांना वेगळे पदार्थ मागविण्याची सोयही यामुळे उपलब्ध झाली आहे.

हा व्यवसाय नगरममध्ये रूजत (Nagar City) असला तरी त्याचा आवाका अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र बिर्याणी, केक, नाष्ट्याचे पदार्थ (Breakfast Food) आणि संपूर्ण जेवणाची थाळी असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत.

पोहे ते पुरणपोळी..

नगर शहरात पोहे ते पुरणपोळी असे घरगुती पदार्थ आता ऑनलाईन मागवता येतात. विद्यार्थ्यांमध्ये सकाळी पोहे आणि समोसे हे विशेष प्रिय आहेत. तर अनेक नोकरदार कुटुंबातून बदल म्हणून पुरणपोळीच्या मेनूला पसंती आहे. सध्या ऑनलाईन घरगुती किचन्समधून शाकाहारी पदार्थच अधिक उपलब्ध होतात, हे देखील एक वेगळेपण आहे.

करोनाने कुटुंबाचे अर्थकारण बिघडल्याने खाद्यपदार्थ विक्री करण्याची कल्पना मनात आली. सुरुवातीला कमी पण नंतर अपेक्षित प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी, नोकरदार नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत पदार्थ ऑनलाईन सेवेद्वारे मागवू लागले. पोहे, उपीट, पराठा, ऑम्प्लेट या नाष्ट्यांच्या पदार्थांबरोबरच पुरणपोळी, उपवास थाळी, शेवभाजी, कोथिंबीर वडी हे मेनूही लोक आवडीने मागवतात. फायद्यापेक्षा पदार्थांच्या दर्जाकडे जास्त लक्ष देत असल्याने ग्राहकांच्या तृप्तीचे समाधान मिळते.

- क्लाऊड किचन व्यावसायिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com