या तालुक्यात घोणस अळीचा मोठा प्रादुर्भाव

शेतकऱ्यांला घेतला घोणस आळीन चावा ||पिकांबरोबरच शेतकर्‍यांवर संकट
या तालुक्यात घोणस अळीचा मोठा प्रादुर्भाव

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पाचेगाव (Pachegav) व पुनतगावमध्ये (Punatgav) सध्या घोणस अळीचा मोठा (Ghonas Worms Crisis) प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळी पासून पिकांना (Crops) तर नुकसान आहेच, पण आता तर शेतकऱ्यांना देखील भीती आहे. पाचेगाव (Pachegav) येथील बंडू रासकर नावाच्या शेतकरी रविवारी दुपारी आपल्या पशुसंवर्धनास चारा आणण्यासाठी शेतात गेला. तर त्याला गिनींगवत तोडत असताना या घोणस अळी ने चावा घेतला. त्यात त्याला खुप वेदना झाल्या, त्याने स्थानिक गावातील तुवर डॉक्टरांकडे उपचार घेतले असता त्याला बरे वाटल्याच्या त्यांनी सांगितले.

या घोणस अळीने शेतकऱ्यांना पुढे मोठे संकट उभे केले आहे,त्या अळीच्या चाव्याने अर्धं अंग पूर्ण बधीर होत. ही अळी प्रामुख्याने ऊसाच्या फडात, गवत व घासावर जास्त प्रमाणात आढळून येत आहे. तिचे सायंटिफिक नाव स्लग कॅटरपिल्लर असे आहे, पण शेतकरी त्याला घोणस अळी म्हणतात. ही अळी एकदम विषारी आहे. ही अळी ब्लेड सारखे काटेरी आहे, तीचा रंग पिवळा व हिरवा आहे. तिच्या अंगावर पूर्ण कडक काटे उभे आहे. आधीच पिकांवर या अळीचे संकट आहेच पण आता शेतकर्‍यांवर देखील मोठे संकट उभे राहिले आहे. पुनतगाव येथील देखील एक शेतकर्‍यांच्या घासावर या अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला.

मी सकाळी दहा वाजाच्या सुमारास माझ्या जनावरांना साठी चारा आणण्यासाठी गेला,ती घोणस नावाच्या अळीने मला फक्त स्पर्श केला, त्यानंतर मला भयानक वेदना सुरू झाल्या.मी ताबडतोब स्थानिक डॉक्टरांकडे गेलो.मला त्यांनी एक इंजेक्शन दिले व मेडिकल मधील गोळ्या दिल्या.त्यानंतर माझ्या वेदना थोडे कमी झाल्या. पण सायंकाळ पर्यन्त वेदना सुरूच होत्या. तबल दहा तासांचा अवधी होऊन गेल्यानंतर देखील वेदना सुरूच होत्या त्यामुळे वरीलपातळीवर या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरात लवकर उपयोजना करण्यात यावे.

बंडू रासकर पाचेगाव (शेतकरी)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com