घोगरगाव येथे वीज रोहित्राचे काम बंद पाडले; महिलेवर गुन्हा दाखल

घोगरगाव येथे वीज रोहित्राचे काम बंद पाडले; महिलेवर गुन्हा दाखल

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील घोगरगाव शिवारात वीज रोहित्रावर वीज जोडणीचे काम करत असताना महिलेने काम बंद पाडल्याची घटना घडली. याबाबत वीज वितरणच्या सहायक अभियंत्यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सहायक अभियंता वैभव दिलीप निकम (टाकळीभान कक्ष) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 17 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घोगरगाव शिवारात नवीन रोहित्र बसवून वीज जोडणीचे काम पोलीस बंदोबस्तात करत असताना आरोपी संगीता बाळासाहेब घोगरे रा. घोगरगाव हिने काम बंद पाडून सरकारी कामात अडथळा आणला व पोलिसांशी अरेरावी केली.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 717/2022 भारतीय दंड विधान कलम 353 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com