घोगरगावचा एकजण दीड महिन्यापासून बेपत्ता

घोगरगावचा एकजण दीड महिन्यापासून बेपत्ता

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील एकजण दीड महिन्यापासून बेपत्ता असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत शिवाजी पंढरीनाथ शिंदे (वय 57) धंदा-शेती रा. घोगरगाव ता. नेवासा यांनी खबर दिली असून त्यात म्हटले की, ते घोगरगाव येथे त्यांची पत्नी मुलगा व भाऊ गुलाब पंढरीनाथ शिंदे (वय 52) असे एकत्रित राहतात. भाऊ गुलाब अविवाहित असून तो माझ्याकडेच राहण्यास आहे. 10 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तो म्हणाला की, मला बरे वाटत नसल्याने मी टाकळीभान येथे दवाखान्यात जावून येतो. असे म्हणून तो राहत्या घरातून निघून गेला. परंतु त्यानंतर तो परत आला नाही. यापूर्वीही तो दोन-तीन वेळा घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेलेला होता.

अंगात पांढर्‍या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, उंची 5 फुट 5 इंच, रंग-निमगोरा, चेहरा उभट असे त्याचे वर्णन असून कोणास आढळल्यास नेवासा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.