
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील एका वीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश विठ्ठल येळवंडे या युवकाने आपल्या राहत्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दि. 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता उघडकीस आला.घटनेची माहिती कळताच सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व हेडकॉन्स्टेबल श्री. गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास हवालदार दत्तात्रय गावडे हे करीत आहेत.