घोडेगाव सोसायटी निवडणुकीत घोडेश्वरी शेतकरी विकास मंडळाची सरशी

घोडेगाव सोसायटी निवडणुकीत घोडेश्वरी शेतकरी विकास मंडळाची सरशी

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील घोडेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या घोडेश्वरी शेतकरी मंडळाची सरशी झाली आहे. एका अपक्ष उमेदवारामुळे आठ सर्वसाधारण जागांसाठी निवडणूक झाली होती.

सेवा सोसायटीसाठी अगोदर मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. दोन्ही गट मंत्री शंकरराव गडाख यांना मानणारेच होते. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जागा वाटपात योग्य संधी देत नसल्याने एका गटाने संघटनेच्या हितासाठी सर्व अर्ज मागे घेतले होते. मात्र एका अपक्ष उमेदवाराने अर्ज ठेवल्याने आठ जागांसाठी मतदान होऊन अपक्षाच्या विरोधात गडाख गटाचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते

दत्तात्रय भानुदास बर्‍हाटे (586), संदीप मारुती बोरुडे (571), राजेश नानासाहेब रेपाळे (559), दिलीप शंकर लोंखडे (572), अन्सार इसाक शेख (539), आबासाहेब साहेबराव सोनवणे (561), भास्कर रामदास सोनवणे (589), संदीप प्रकाश सोनवणे (554). बिनविरोधमध्ये ताराबाई भाऊसाहेब येळवंडे, कमल भास्कर कोरडे, मधुकर विश्वनाथ लोंढे, राम नामदेव सोनवणे व शरद तुकाराम चेमटे निवडून आले आहेत. पराभूत अपक्ष उमेदवार ज्ञानदेव दामोधर कोरडे यांना 264 मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोकूळ नांगरे यांनी काम पाहिले. त्यांना सचिव बाळासाहेब दिघे यांनी सहाय्य केले.

Related Stories

No stories found.