घोडेगावात चोरट्यांच्या मारहाणीत एकजण जखमी

अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र, मोटारसायकल, रोख रक्कम व मोबाईलची चोरी
घोडेगावात चोरट्यांच्या मारहाणीत एकजण जखमी

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा (Newasa) तालुक्यातील घोडेगाव (Ghodegav) येथील बर्‍हाटे वस्तीवर चार चोरट्यांनी (thieves) एक जणास मारहाण (Beating) व फरशीच्या तुकड्याने जखमी (Injured) करुन ऐवज व घरासमोर असलेली मोटारसायकल चोरुन नेली. मारहाणीत (Beating) जखमीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस ठाण्याकडून (Police Station) समजलेली माहिती अशी की, घोडेगाव (Ghodegav) येथील संतोष अशोक बर्‍हाटे (रा. बर्‍हाटे वस्ती) यांनी सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) फिर्याद दिली की शुक्रवारी पहाटे दोन वाजता चौघा अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे वडील अशोक भानुदास बर्‍हाटे यांना फरशीच्या तुकड्याने डोक्यात मारहाण (Beating) करत दमदाटी करून फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, रोख रक्कम एक हजार रुपये, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन व पंचवीस हजार रुपये किमतीची प्लॅटीना कंपनीची मोटारसायकल (एमएच 17 सीजे 7318) असा मुद्देमाल चोरून नेला आहे.

मारहाणीत जखमी (Injured) झालेल्या अशोक बर्‍हाटे यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे (Assistant Inspector of Police Ramchandra Karpe) व ज्ञानेश्वर थोरात यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सकाळी श्वानपथक व ठसेतज्ञ येवून गेले मात्र कुठलाही धागादोरा हाती लागला नाही. या घटनेचा पुढील तपास हवालदार श्री. गावडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com