घोडेगावात कांद्याची 60 हजार गोण्या आवक

भावात झाली घसरण
घोडेगावात कांद्याची 60 हजार गोण्या आवक

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी कांद्याच्या आवकेत 16 हजार गोण्यांनी वाढ झाली तर भावात तब्बल 800 रुपयांनी घसरण झाल्याचे दिसून आले. काल 60 हजार 66 गोण्या (33 हजार 36 क्विंटल) एवढी कांद्याची आवक झाली. जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपयांपर्यंत निघाले. बुधवारी जास्तीत जास्त भाव 3800 रुपयांपर्यंत निघाले होते.

उच्च दर्जाच्या कांद्याच्या एक-दोन लॉटला 2900 ते 3000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठ्या कलर पत्ती कांद्याला 2500 ते 2700 रुपये, मिडीयम सुपर कांद्याला 1800 ते 2000 रुपये, गोल्टा कांद्याला 2100 ते 2200 रुपये, गोल्टी कांद्याला 1500 ते 1700 रुपये इतका भाव मिळाला. जोड कांद्याला प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपये तर एकूण सरासरी भाव 2000 ते 2200 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाला. बुधवारी कांद्याचा भाव 3800 रुपयांपर्यंत निघाल्याने कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र भावात 800 रुपयांपर्यंत घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची निराशा झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com