घोडेगावात कांद्याच्या भावात आणखी घसरण

घोडेगावात कांद्याच्या भावात आणखी घसरण

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याच्या भावात 300 रुपयांची घसरण झाल्यानंतर काल शनिवारी त्यात आणखी 700 रुपयांनी घसरण झाली. दोनच बाजारात एक हजारांची घसरण झाली. काल जास्तीत जास्त भाव 2100 रुपयांपर्यंत निघाले. आवक 66 हजार 50 गोण्यांची झाली.

बुधवारच्या तुलनेत आवकेत साडेतीनशे गोण्यांची वाढ झाली. एक-दोन लॉटला 2000 ते 2100 रुपये, मोठा कलरपत्ती कांद्याला 1600 ते 1850 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1400 ते 1550 रुपये, गोल्टा कांद्याला 1000 ते 1300 रुपये, गोल्टी कांद्याला 500 ते 800 रुपये, जोड कांद्याला 300 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 400 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com