घोडेगावात कांदा 1200 रुपयांपर्यंत स्थिर

घोडेगावात कांदा 1200 रुपयांपर्यंत स्थिर

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारच्या तुलनेत बुधवारी कांद्याच्या आवकेत 700 गोण्यांनी वाढ झाली. बुधवारी 20 हजार 212 कांदा गोण्यांची आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1200 रुपयांपर्यंत स्थिर होते.नवीन उन्हाळ गावरान कांद्याची आवक होत आहे.

एक-दोन लॉटला 1100 ते 1200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 900 ते 1050 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 700 ते 900 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 100 ते 400 रुपये, जोड कांद्याला 200 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Related Stories

No stories found.