घोडेगावात कांदा 1200 रुपयांपर्यंत

घोडेगावात कांदा 1200 रुपयांपर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल गुरुवारी कांद्याची 16 हजार 801 गोण्या आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1200 रुपयांपर्यंत निघाले.

एक-दोन लॉटला 1100 ते 1200 रुपयांचा भाव मिळाला. मोठा कलर पत्तीवाल्या कांद्याला 900 ते 1000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 700 ते 900 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 600 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 400 रुपये तर जोड कांद्याला 250 ते 300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.