घोडेगावात कांदा 1300 रुपयांपर्यंत

घोडेगावात कांदा 1300 रुपयांपर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल सोमवारी कांद्याला जास्तीत जास्त 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

कांद्याची एकूण 16 हजार 581 गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला 1200 ते 1300 रुपये भाव मिळाला. मोठा कलर पत्ती कांद्याला 900 ते 1000 रुपयांचा भाव मिळाला. मुक्कल भारी कांद्याला 700 ते 800 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 600 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 400 रुपये, जोड कांद्याला 250 ते 300 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Related Stories

No stories found.