घोडेगावात कांदा आवकेत मोठी वाढ; भाव 1200 पर्यंत

घोडेगावात कांदा आवकेत मोठी वाढ; भाव 1200 पर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ सुरुच असून जास्तीत जास्त भाव 1200 रुपयांपर्यंत स्थिर आहेत. काल बुधवारी जवळपास 40 हजार (39 हजार 819) गोण्या (21 हजार 457 क्विंटल) कांद्याची आवक झाली. एक-दोन लॉटला 1100 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

मोठा कलरपत्ती कांद्याला 900 ते 1000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 800 ते 900 रुपये, गोल्टा कांद्याला 600 ते 800 रुपये, गोल्टी कांद्याला 100 ते 300 रुपये, जोड कांद्याला 200 ते 250 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 100 ते 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Related Stories

No stories found.