घोडेगावात कांदा आवकेत घट

घोडेगावात कांदा आवकेत घट

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी कांद्याच्या आवकेत (Onion Inward) 18 हजार गोण्यांनी घट झाली. सोमवारी 58 हजार 654 गोण्या (32 हजार 218 क्विंटल) आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1800 रुपयांपर्यंत निघाले. शनिवारच्या तुलनेत ते 100 रुपयांनी कमी आहेत.

काल एक-दोन लॉटला 1600 ते 1800 रुपये भाव मिळाला. मोठ्या कलरपत्ती कांद्याला (Onion) 1300 ते 1400 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1200 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 800 ते 900 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 700 रुपे, जोड कांद्याला (Onion) 200 ते 450 रुपये, हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com