घोडेगावात कांद्याची पाऊण लाख गोण्या आवक; भाव 2300 पर्यंत

घोडेगावात कांद्याची पाऊण लाख गोण्या आवक; भाव 2300 पर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) काल बुधवारी जवळपास 75 हजार (74 हजार 916) कांदा गोण्यांची आवक (Onion Bag inward) झाली. भाव जास्तीत जास्त 2300 रुपयांपर्यंत निघाले.घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची प्रचंड आवक सुरू आहे.

काल बुधवारी 74 हजार 916 गोण्या (41 हजार 782 क्विंटल) आवक झाली. मोठ्या मालाला 1900 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1800 ते 1900 रुपये, मध्यम मालाला 1600 ते 1700 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 900 ते 1300 रुपये तर जोड कांद्याला (onion) 400 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. एक-दोन वक्कलला 2200 ते 2300 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com