घोडेगावात 65 हजार 622 कांदा गोण्यांची आवक; भाव 2400 पर्यंत

घोडेगावात 65 हजार 622 कांदा गोण्यांची आवक; भाव 2400 पर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक होत असून काल सोमवारी 65 हजार 622 गोण्या कांद्याची आवक झाली. भाव जास्तीत जास्त 2400 रुपयांपर्यंत निघाला.

काल मोठ्या मालाला 1900 ते 2200 रुपये भाव मिंळाला. मध्यम मोठ्या कांद्याला 1800 ते 1900 रुपये, मध्यम मालाला 1600 ते 1700 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 1200 ते 1500 रुपये भाव मिळाला. एक दोन वक्कलला 2300 ते 2400 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. शनिवारच्या दिवशी 74 हजार 870 गोण्या कांद्याची आवक झाली होती.

काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी 65 हजार 622 गोण्या आवक झाल्याने या आठवड्यातही कांद्याची मोठी आवक राहणार असल्याचे दिसून येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com