घोडेगावात कांदा 4100 रुपयांपर्यंत

घोडेगावात कांदा 4100 रुपयांपर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याची आवक व बाजारभाव स्थिर होते.

काल 17 हजार 571 गोण्या आवक झाली. शनिवारच्या तुलनेत ती 206 गोण्यांनी कमी होती. तर जास्तीत जास्त भाव 4100 रुपयांपर्यंत निघाले. शनिवारच्या तुलनेत ते 100 रुपयांनी कमी आहेत. घोडेगावात काल एक नंबरच्या कांद्याला 3800 ते 4100 रुपये भाव मिळाला.

दोन नंबरला 3000 ते 3500 रुपये, गोल्टी कांद्याला 2900 ते 3000 रुपये, तर जोड कांद्याला 2000 ते 2500 रुपये भाव मिळाला. तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com