घोडेगावात कांद्याची अत्यल्प आवक

घोडेगावात कांद्याची अत्यल्प आवक

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारच्या लिलावासाठी कांद्याची अत्यल्प आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1300 रुपयांपर्यंत निघाले. कांद्याची एकूण 6228 गोण्या आवक झाली.

एक-दोन लॉटला 1100 ते 1300 रुपये, मोठा कलर पत्तिवाला कांद्याला 950 ते 1050 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 800 ते 900 रुपये, गोल्टा 600 ते 700 रुपये, गोल्टी 400 ते 500 रुपये, जोड कांद्याला दीडशे ते दोनशे रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com