
नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) बुधवारी कांद्याच्या (Onion) आवकेत वाढ झाली असून जास्तीत जास्त भाव 1900 रुपयांपर्यंत स्थिर होते.
बुधवारी 60 हजार 143 गोण्या नवीन लाल कांद्याची (Onion) आवक झाली. एक-दोन लॉटला 1700 ते 1800 रुपये, मोठा कलर पत्तिवाला 1550 ते 1700 रुपये, मुक्कल भारी 1400 ते 1500 रुपये, गोल्ट 1100- ते 1300 रुपये, गोल्टी 500 ते 900 रुपये, जोड कांदा (Onion) 200 ते 600 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला (Onion) 200 ते 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.