घोडेगावात लाल कांद्याच्या आवकेत वाढ

घोडेगावात लाल कांद्याच्या आवकेत वाढ

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) उन्हाळ गावरान कांद्याच्या (Onion) दरात मोठी घट झाली आहे. तर लाल कांद्याचे (Onion) दर स्थिर आहेत. गावरान कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 1350 रुपयांपर्यंत तर लाल कांद्याला (Onion) 2100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. काल कांद्याची एकूण 62 हजार 573 गोण्या आवक झाली.

घोडेगावात लाल कांद्याच्या आवकेत वाढ
पारेगाव बुद्रूक येथून मोटारसायकल चोर जेरबंद

लाल कांद्याच्या (Onion) आवकेत मोठी वाढ झाली आहे. लाल कांद्याची (Onion) 58 हजार 177 गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला 1900 ते 2100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्तीवाल्या कांद्याला 1700 ते 1800 रुपये, मुक्कल भारी कांद्याला (Onion) 1500 ते 1600 रुपये, गोल्टा कांद्याला 1200 ते 1400 रुपये तर गोल्टी कांद्याला (Onion) 800 ते 850 रुपये भाव मिळाला.

घोडेगावात लाल कांद्याच्या आवकेत वाढ
महाविकास आघाडीच्या काळात उद्योग व्यवसाय राज्याबाहेर गेले

उन्हाळ गावरान कांद्याच्या (Onion) एक-दोन लॉटला 1300 ते 1350 रुपये, मोठा कलर पत्तीवाल्या कांद्याला 1200 ते 1300 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1100 रुपये, गोल्टा कांद्याला 500 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 500 रुपये, जोड कांद्याला (Onion) 200 ते 300 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला (Onion) 100 ते 200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

घोडेगावात लाल कांद्याच्या आवकेत वाढ
महिला पोलीस अंमलदाराची आत्महत्या
घोडेगावात लाल कांद्याच्या आवकेत वाढ
पांढरीपूल येथे एसटी बस कारवर धडकल्याने प्रवासी जखमी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com