घोडेगावातील गावरान व लाल कांद्याचा वाचा भाव

घोडेगावातील गावरान व लाल कांद्याचा वाचा भाव

नेवासा |का. प्रतिनीधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी गावरान कांद्याला जास्तीत जास्त 2400 रुपये तर लाल कांद्याला 2600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. काल एकूण 38 हजार 200 गोण्यांची आवक झाली.

गावरान कांद्याच्या एक-दोन लॉटला 2300 ते 2400 रुपये, मोठा कलर पत्तिवाला कांद्याला 1900 ते 2050, मुक्कल भारी 1000 ते 1800 रुपये, गोल्टा 700 ते 800, गोल्टी 300 ते 500 रुपये, जोड 200 ते 300 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला. नविन लाल कांद्याची 25 हजार 500गोणी आवक झाली.

एक-दोन लॉटला 2200 ते 2600 रुपये भाव मिळाला. मोठा कलर पत्तिवाला कांद्याला 2000 ते 2100 रुपये, मुक्कल भारी-1600 ते 1900 रुपये, गोल्टा कांद्याला 1200 ते 1500 रुपये तर गोल्टी कांद्याला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com