नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावाने अचानक उसळी घेतली. काही वक्कलांना भाव 4200 रुपयांपर्यंत निघाले.

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल 19 हजार 772 गोण्या आवक झाली. एक नंबर कांद्याला 3500 ते 4000 रुपये भाव मिळाला. दोन नंबरला 2800 ते 3000 रुपये, गोल्टी कांद्याला 2500 ते 3000 रुपये, जोड कांद्याला 1300 ते 1500 रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. काही वक्कलांना 4200 पर्यंत भाव मिंळाला.

लाल कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने लाल कांदा पिक घेतलेल्या शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त आहे. कांद्याच्या भावात चांगली वाढ झाली असली तरी ही वाढ तात्पुरती आहे. कारण पुढील महिन्यात गावरान कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाल्यावर मोठ्या प्रमाणात आवक वाढून भाव कोसळणार आहेत.