घोडेगावात कांद्याच्या आवकेत घट

भाव स्थिर
घोडेगावात कांद्याच्या आवकेत घट

नेवासा |का. प्रतिनिधी| Newsa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) सोमवारच्या तुलनेत बुधवारी कांद्याच्या आवकेत (Onion Inward) 9 हजार गोण्यांनी घट झाली. बुधवारी 46 हजार 100 कांदा गोण्यांची आवक झाली. जास्तीत जास्त भाव गावरान कांद्याला 1800 पर्यंत तर लाल कांद्याला (Onion) 2300 रुपयांपर्यंत मिळाले.

घोडेगावात कांद्याच्या आवकेत घट
थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

उन्हाळ गावरान कांद्याच्या (Onion) एक-दोन लॉटला 1600 ते 1800 रुपये, मोठा कलरपत्ती वाल्या कांद्याला (Onion) 1300 ते 1550 रुपये, मुक्कल भारी कांद्याला (Onion) 1100 ते 1300 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 700 ते 1000 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 500 ते 700 रुपये, जोड कांद्याला (Onion) 300 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला (Onion) 200 ते 400 रुपये भाव मिळाला.

घोडेगावात कांद्याच्या आवकेत घट
हिंदू जन आक्रोश मोर्चाला प्रतिसाद

नवीन लाल कांद्याची 2 हजार 983 गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला 2200 ते 2300 रुपये भाव मिळाला. मोठ्या कलरपत्तीवाल्या कांद्याला (Onion) 2100 ते 2200 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1600 ते 1900 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 1200 ते 1400 रुपये, गोल्टी कांद्याला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला.

घोडेगावात कांद्याच्या आवकेत घट
बस चालकाला मारहाण

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com