घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) सोमवारी कांद्याची (Onion) 56 हजार 765 गोण्या आवक झाली. शनिवारच्या तुलनेत आवक 13 हजार गोण्यांनी घटली. जास्तीत जास्त भाव 3300 रुपयांपर्यंत निघाले. शनिवारच्या तुलनेत ते 100 रुपयांनी अधिक आहेत.

एक-दोन लॉटला 3000 ते 3300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्तीवाल्या कांद्याला 2500 ते 2800 रुपये, मुक्कल भारी कांद्याला (Onion) 2300 ते 2550 रुपये, गोल्टा कांद्याला 1600 ते 2100 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 1400 ते 1750 रुपये, जोड कांद्याला (Onion) 600 ते 900 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 300 ते 800 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com