घोडेगावात कांद्याला मिळतोय 'हा' भाव

घोडेगावात कांद्याला मिळतोय 'हा' भाव

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये(Ghodegav Onion Market) शनिवारी कांद्याच्या आवकेत (Onion Inward) 4 हजार गोण्यांनी वाढ झाली. आज 20 हजार 779 गोण्या कांद्याची आवक (Onion Inward) झाली. भाव जास्तीत जास्त 1200 रुपयांपर्यंत स्थिर होते.

एक-दोन लॉटला 1100 ते 1200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलर पत्ती कांद्याला (Onion) 900 ते 1000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 700 ते 900 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 600 रुपये, गोल्टी कांद्याला 100 ते 300 रुपये, जोड कांद्याला (Onion) 200 ते 300 रुपये भाव मिळाला. हलका डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.