घोडेगावात लाल कांद्याच्या भावातील तेजी कायम

एकूण 55 हजार 500 गोण्यांची आवक
घोडेगावात लाल कांद्याच्या भावातील तेजी कायम

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत साडेबारा हजार गोण्यांनी वाढ झाली.

लाल कांद्याला जास्तीत जास्त 4 हजारापर्यंत तर गावरान कांद्याला 3500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. काल कांद्याची एकूण आवक 55 हजार 508 गोण्या इतकी झाली.

काल सोमवारी लाल कांद्याची 42 हजार 548 गोण्या आवक झाली. एक नंबर कांद्याला 3500 ते 4000 रुपये, दोन नंबरला 2500 ते 3000 रुपये तर तीन नंबरला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.

गावरान कांद्याची 12 हजार 960 गोण्या आवक झाली. एक नंबर कांद्याला 3000 ते 3500 रुपये, दोन नंबरला 2500 ते 2800 रुपये, गोल्टी कांद्याला 2500 ते 2700 रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.

शनिवारी एकूण 43 हजार गोण्या आवक झाली होती. त्या तुलनेत काल साडेबारा हजार गोण्या अधिक आवक झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com