घोडेगाव परिसरात सहा लाखाचा तेरा टन लोखंडाचा ट्रक लुटला

घोडेगाव परिसरात सहा लाखाचा तेरा टन लोखंडाचा ट्रक लुटला

सोनई |वार्ताहर| Sonai

अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव शिवारात शुक्रवार दि. 10 रोजी रात्री एक वाजता सहा लाख रुपये किमतीचा 13 टन लोखंडी गजाचा ट्रक आडवळणी रस्त्यावर घेऊन जाऊन चार चोरट्यांनी लुटला.

याबाबत सोनई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जालन्याहून पुण्याकडे जात असलेल्या टाटा कंपनीचा मालवाहतूक ट्रक क्रमांक एम. एच. 12 के. पी. 3295 या ट्रकचा शुक्रवार दि. 10 रोजी रात्री एक वाजता औरंगाबाद ते अहमदनगर रोड वरील घोडेगाव शिवारातील चर्चजवळ दोन मोटरसायकल वरून चार चोरट्यांनी पाठलाग करत ट्रक अडवला व दोन चोरट्यांनी ट्रक मध्ये प्रवेश करून चालकास चाकूचा धाक दाखवून ट्रक मधील 5 लाख 61 हजार रुपयाचा सहा एमएम, वीस एमएम, पंचवीस एमएम, सोळा एम एम, बारा एमएम गेजचे 10450 किलो वजनाचे लोखंडी सळई तसेच सात हजार रुपयाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण 5 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याबाबत निसार गुलाब शेख (वय 34) धंदा ट्रान्सपोर्ट अशरफ नगर पुणे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 191 / 2022 कलम 392, 363 ,341 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com