घोडेगाव येथे अवैध दारू विक्री करताना दोघे ताब्यात

37 बाटल्या जप्त; नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
घोडेगाव येथे अवैध दारू विक्री करताना दोघे ताब्यात

सोनई |वार्ताहर| Sonai

अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या (LCB) पथकाने घोडेगाव येथे छापा टाकून देशी दारूची विनापरवाना विक्री (Alcohol Unlicensed sale) करत असलेल्या दोन जणांस मुद्देमालासह अटक (Arrested) केली.

याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार घोडेगावमध्ये अवैध दारूची विक्री (Ghodegav Alcohol sales) होत असल्याच्या वाढत्या तक्रारीवरुन नगरच्या गुन्हे शाखेने (LCB) दोन ठिकाणी कारवाई केली. त्यातील पहिली फिर्याद हवालदार संदीप काशिनाथ घोडके यांनी दिली असून त्यावरून आरोपी सोमनाथ सारंगधर सोनवणे (वय 41) रा. घोडेगाव याच्यावर गुन्हा दाखल केला तर तर दुसरी फिर्याद ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी दिली. त्यावरुन आरोपी बाळू दशरथ गायकवाड वय (41) रा. घोडेगाव याच्यावर गुन्हा दाखल केला. हे दोघे घोडेगाव चौकात एका टपरीच्या आडोशाला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भिंगरी देशी दारूच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगलेले आढळून आले.

एका आरोपीकडून (One accused) 1200 रुपये किमतीच्या भिंगरी देशी दारूच्या 180 मिलीच्या 20 सीलबंद बाटल्या तर दुसर्‍या आरोपीकडून 1020 रूपये किमतीच्या भिंगरी देशी दारूच्या 180 मिलीच्या 17 सीलबंद बाटल्या मिळून आल्या. आरोपींवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार श्री. गायकवाड करत आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध धंद्याविरोधात सर्वच पोलीस ठाण्यांना सक्त ताकीद दिली होती. ज्या हद्दित अवैध धंदे आढळून येतील तेथील बिट हवालदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे त्यात म्हटले होते. आता घोडेगावमध्ये कारवाई झाल्यामुळे संबंधितांवर काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com