घोडेगाव येथे गोळीबार करुन दोन वर्षापासून फरार आरोपीस इमामपूर येथे अटक

घोडेगाव येथे गोळीबार करुन दोन वर्षापासून फरार आरोपीस इमामपूर येथे अटक

सोनई |वार्ताहर| Sonai

दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास सोनई पोलिसांनी (Sonai Police) इमामपूर (Imampur) परिसरातून अटक (Arrested) केली. याबाबत अधिक माहिती अशी की, 14 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी सहा वाजता औरंगाबाद-नगर राज्य महामार्गावरील (Aurangabad-Nagar State Highway) गुडलक हॉटेल घोडेगाव येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कृष्णा यलप्पा फुलमाळी (वय 28) रा. घोडेगाव याने गावठी कट्ट्यातुन (Gavthi Katta) गोळीबार करून सचिन गोरख कुर्‍हाडे या तरुणाला गंभीर जखमी (Youth Injured) करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

पण दोन वर्षापासून आरोपी फरार होता. सोनईचे सहाय्यक निरीक्षक रामचंद्र कर्पे (Assistant inspector Ramchandra Karpe) यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टाफसह शुक्रवार 30 जुलै रोजी रात्री दहा वाजता साध्या वेषात इमामपूर येथील गिरणीचा महादेव या मंदिर परिसरात छापा (Raid) टाकून आरोपी फुलमाळी यास अटक केली. आरोपीविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात चार व शिंगणापूर पोलीस ठाण्यात (Shinganapur Police Station) एका गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी फुलमाळी हा बेकायदा शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करणाऱा सराईत गुन्हेगार आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, हवालदार दत्ता गावडे, पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलीस नाईक माने, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com