घोडेगावचा जनावरे बाजार शुक्रवारपासून होणार पूर्ववत सुरू

File Photo
File Photo

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

राज्यात प्रसिद्ध असलेला नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार 5 नोव्हेंबरपासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मागील महिन्यात 8 ऑक्टोबरला आदेश काढून जिल्ह्यातील राशिन, मिरजगाव, काष्टी, वाळकी, घोडेगाव, लोणी, जामखेड व संगमनेर हे सर्व प्रमुख जनावरांचे बाजार लाळ्या-खुरकतच्या साथीचा प्रसार होऊ नये यासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता.

दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्याधिकारी यांनी पुन्हा बाजार सुुरू करण्याचा आदेश काढला असून त्यामुळे आता येत्या शुक्रवारचा (5 नोव्हेंबर) घोडेगाव येथील जनावरांचा बाजार भरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com