घोडेगावचा जनावरे बाजार पुन्हा बंद

घोडेगावचा जनावरे बाजार पुन्हा बंद

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

राज्यातील प्रसिद्ध असलेला नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) घोडेगाव (Ghodegav) येथे शुक्रवारी भरणारा जनावरांचा बाजार (Animal Market) लाळ्या-खुरकतच्या साथीमुळे बेमुदत बंद (Close) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी यासंदर्भात आदेश काढून जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जवळपास दीड वर्षांपासून करोनामुळे जनावरांचा बाजार बंद होता. गेल्या महिन्यात तो सुरू झाला होता. आता जनावरांमधील लाळ्या-खुरकत आजाराचा प्रसार राज्यात होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्वच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील राशीन, मिरजगाव, काष्टी, वाळकी, घोडेगाव, लोणी, जामखेड व संगमनेर हे प्रमुख जनावरांचे बाजार असून हे सर्व बाजार 9 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.